महानुभाव पंथीयांचा भव्य सत्संग सोहळा; एक महिन्याचा चातुर्मास, अडीच हजार शिष्यगण चंदनापुरीत होणार दाखल; गुरूवर्याचे आज होणार आगमन
संगमनेर प्रतिनिधी
श्री देवदत्त आश्रम जाधववाडी पुणे येथील परम पूज्य प. म. सर्वविंद आचार्य प्रवर श्री मोठेबाबा अंकुलनेरकर संस्थापक संचालक हे आपल्या शिष्यगणा समवेत चंदनापुरी येथे एक महिन्याच्या चातुर्मासासाठी आगमन होणार आहे. या दरम्यान आचार्य प्रवर श्री मोठेबाबा अंकुलनेरकर हे निवास राहणार असून पोथी, प्रवचन, दैनंदिन दिनचर्या, सत्संग, पूजापाठ, श्री चक्रधर स्वामींच्या उपदेशाचे चिंतन होणार आहे. गुरुवर्य श्री मोठे बाबाजी तसेच आलेल्या सर्व संतमंडळी आणि बांधवांच्या सहर्ष स्वागतासाठी सदरचे कार्यस्थळ सुसज्ज झाले असून महानुभाव पंथीय सत्संग सोहळ्याच्या पूर्वतयारीची पाहणी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली असून यावेळी थोरात यांनी या सोहळ्याच्या नियोजना विषयी आयोजकांशी चर्चा केली.तालुक्यातील चंदनापुरी येथील सर्वज्ञ नगर, शिरापुर रस्ता परिसरात महानुभाव पंथीय भव्य सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचा शुभारंभ बुधवार दिनांक २६ मार्च रोजी होणार अडीच हजारो महानुभावी भक्तगण वासनिक येत आहेत. याप्रसंगी अशोक लांडगे, सरपंच भाऊराव रहाणे, एस. आर रहाणे, विजय रहाणे, आर. एम. कातोरे, आर.बी. रहाणे, कैलास सरोदे, शांताराम रहाणे, संदीप कढणे, अनिल कढणे, किरण रहाणे, राहुल वालझाडे, श्याम दिवटे, महेश लांडगे, हरीष लांडगे, अशोक लांडगे, अनिल घुले, भीमराज नवले, दत्ताभाऊ कांगणे, आनंदा राहणे, विनोद राहणे आदींसह चंदनापुरी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.