भारत

गो वंश जनावरांना नेणारी सहा वाहने पकडली; 16 लाख 81 हजाराचा माल जब्त दहा जणावर गुन्हे दाखल

Blog Image
एकूण दृश्ये: 19

गो वंश जनावरांना नेणारी सहा वाहने पकडली; 16 लाख 81 हजाराचा माल जब्त दहा जणावर गुन्हे दाखल 

   संगमनेर

बजरंग दल कार्यकर्त्यांच्या मदतीने घारगाव पोलिसांनी मोठी कारवाई करीत जनावरांना नेणारी सहा वाहने पकडली असून दहा जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत पोलिसांनी सहा वाहनासह 16 लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुणे नाशिक महामार्ग साईबाबा मंदिरा जवळ माहुली शिवारात ही कारवाई करण्यात आली. फारुक युसूफ सय्यद अल्कानगर, सहबाज अजिज शेख कुरण रोड, शब्बीर शेख संगमनेर खुर्द, संतोष सखाराम भिसे डिग्रस, मोबीन शेखलाल शेख मदिनानगर , साद सफिक शेख अजिज छोटू शेख संगमनेर खुर्द, अजय सुरेश शिंदे हिवरे नारायणगाव, अझहर मोईन शेख संगमनेर, माणिक बाळू गोरे डिग्रस अशा दहा जणांवर बजरंग दलाचे कार्यकर्ते रोशन रमेश कवडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सुरू आहे.

सुखाचे रहस्य समाधानात आहे.

संत ज्ञानेश्वर
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin