भारत

*ठसा उमटवणारा तांबट समाज या देशात स्वतःचा वेगळा ठसा उमटवेल :- नीलम खताळ* [ भगवान विश्वकर्मा प्रकटदिन साजरा ]

Blog Image
एकूण दृश्ये: 71

*ठसा उमटवणारा तांबट समाज या देशात स्वतःचा वेगळा ठसा उमटवेल :- नीलम खताळ*

[ भगवान विश्वकर्मा प्रकटदिन साजरा ]  

     संगमनेर { प्रतिनिधी }

धातू कारागिरी हा भारताचा अमूल्य ठेवा आहे. त्याचे जतन संवर्धन विश्वकर्मा समाज बांधवांनी अविरतपणे केले आहे. विश्वकर्मा समाज बांधवांना लाभलेली दैविकला ही उपजतच आहे. सृष्टीचे निर्माता विश्वकर्मा भगवान आहेत. वास्तूची आणि मंदिराची उभारणी पाच धातू शिवाय होणे अशक्य आहे . धातूवरही स्वतःचा ठसा उमटविणारे तांबट समाज बांधव हेच एक दिवस या देशात आपला आगळावेगळा ठसा उमटवतील असे मौलिक प्रतिपादन संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या सुविद्य पत्नी नीलम खताळ यांनी केले. गंगामाई घाट येथे विश्वकर्मा पांचाळ तांबट समाजाच्या वतीने माघ शुक्ल त्रयोदशीला समाजाच्या वतीने विश्वकर्मा प्रकट दिन साजरा करण्यात आला त्यावेळी सौ खताळ बोलत होत्या. खताळ यांच्या हस्ते अवजारांचे पूजन करण्यात आले. खताळ म्हणाल्या की, लोहार, सुतार, तांबट, सोनार, शिल्पकार हे पाचही समाजबांधव या दिवशी एकत्रित येऊन भगवान विश्वकर्मा प्रगट दिन मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करतात. बहिणी बरोबर भावांना प्राधान्य दिले पाहिजे. समाज आणि देश घडविण्यात बहीण भावाचे योगदान मोलाचे असते. असे सांगत नीलम खताळ यांना यावेळी आपले बालपण आठवले. त्यानी जुन्या आठवणींना उजाळा दिला. जुनी तांबे पितळीची भांडी त्यास उजळ करून देणारा हा समाज. या भांड्यांना पारदर्शक असे ठसे मारतो. या समाजाचे जीवन पारदर्शी असल्याने या ठशात आपले प्रतिबिंब स्पष्ट दिसून येते. ते प्रतिबिंब पाहतांना मनाला प्रसन्न वाटते . भगवान श्री विश्वकर्मांचा वरदहस्त लाभलेली कला ही जन्मजात उपजत आहे. प्रत्येक पिढीला ती लाभो असे सांगत सर्व विश्वकर्मा समाज बांधवाना विश्वकर्मा प्रगट दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. यावेळी नीलम खताळ यांनी संगीत खुर्चीचा आनंद घेतला. आपण कायम समाजा सोबत असून शक्य ती मदत करू असे ही त्या म्हणाल्या. साळीवाडा येथे विश्वकर्मा सुतार समाज बांधव आणि मिरवणूकीचे स्वागत तांबट समाज बांधवाच्या वतीने करण्यात आले. यावेळी विश्वकर्मा पांचाळ तांबट समाजाच्या वतीने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या स्पर्धकांचे अतिथी मान्यगनांनी कौतुक केले. उपस्थित अतिथींच्या हस्ते स्पर्धकांना सन्मानित करण्यात आले. यावेळी सत्यनारायण पूजा , विश्वकर्मा आरती, स्तवन , सांस्कृतिक, ज्ञानार्जन करणारे धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व समाज बांधवांचे,,युवा, युवतीचे मोलाचे योगदान लाभले.

----- Advertisements -----

श्रम हेच यशाचे खरे साधन आहे.

लोकमान्य टिळक
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin