भारत

शिक्षकाकडून शिक्षकेला जबर मारहाण, गुन्हा दाखल ; श्रमशक्ती विद्यालयातील प्रकार

Blog Image
एकूण दृश्ये: 31

शिक्षकाकडून शिक्षकेला जबर मारहाण, गुन्हा दाखल ; श्रमशक्ती विद्यालयातील प्रकार

   संगमनेर 

शाळेतील मुलांना वस्तू बनविण्यासाठी आणलेल्या गुच्छा वरून किरकोळ भांडणाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाल्याने श्रमशक्ती विद्यालयातील एका शिक्षकाने महिला शिक्षकेला चक्क विद्यार्थ्यां समोर बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खबर उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मालदाड मध्ये असलेल्या श्रमशक्ती विद्यालयात विचित्र प्रकार घडला. येथील विद्यालयात शिक्षक दत्तू मारूती कोंटे यांनी बाचाबाचीतून एका शिक्षकेला जबर मारहाण केली. यामध्ये शिक्षक महिलेच्या कानाला जबर मार तर लागलाच. तसेच महिला शिक्षिका खुर्चीवरून खाली पडल्यनंतरही सदर शिक्षक या महिलेला मारतच होता. हा सर्व प्रकार विद्यार्थ्यासमोर घडल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. शिक्षकांनेच चक्क महिला शिक्षिकेला मारहाण केल्याने संतप्त झालेल्या शिक्षकेने आपल्या पती समवेत थेट पोलीस स्टेशन गाठले व सदर शिक्षकाविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे या घटनेमुळे संगमनेर तालुक्यातील शिक्षक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.महिला शिक्षिकेच्या पतीने तालुका पोलीसात दत्तू कोंटे या शिक्षका विरोधात तक्रार दाखल केल्याने सदर शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

कठीण काळातही आत्मविश्वास ठेवा.

महात्मा गांधी
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin