मृत्यू

शेतकरी युवकाने आंब्याच्या झाडाला दोरी लावून घेतला गळफास ; कर्जाचा डोंगर असह्य झाला ? डोंगराच्या कडेला संपवले जीवन

Blog Image
एकूण दृश्ये: 622

शेतकरी युवकाने आंब्याच्या झाडाला दोरी लावून घेतला गळफास ; कर्जाचा डोंगर असह्य झाला ? डोंगराच्या कडेला संपवले जीवन

    अकोले [ प्रतिनिधी ]

गुरांना चारा कापून आणतो असे सांगून घरातून विळा आणि दावे घेऊन निघालेल्या एका 32 वर्षीय युवक असलेल्या शेतकऱ्यांने टोकाचे पाऊल उचलत जांभूळदरा येथील डोंगराच्या कडेला आंब्याच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्राच संपवली. या घटनेने संपूर्ण अकोले तालुका हादरून गेला. बहुदा अकोले तालुक्यातील ग्रामीण भागातील ही पहिलीच घटना असावी की, एका शेतकऱ्यांने कर्जाला कंटाळून स्वतःचे जीवन संपवले ?. 70 -75 वय गाठलेले म्हातारे आई-वडील आणि पाच वर्षाच्या आतील दोन चिमुकले आणि आपल्या सहचारिणीना असे एकाकी सोडून असह्य झालेल्या या शेतकऱ्यांने मृत्यूलाच कवटाळले. या बाबत हकीकत अशी की, मुथाळणे तालुका अकोले येथील वाळीबा ऊर्फ नवनाथ एकनाथ सदगीर वय वर्ष 32 याने आंब्याच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन जीवन संपवले. नवनाथ याने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. हतबल झालेल्या आई- वडिलांनी आमची कोणाविरुद्धही तक्रार नसल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटलेले आहे. परंतु अशिक्षित असलेला 75 वर्षाचा बाप आमच्यावर बँकेचे अडीच लाखाचे कर्ज असल्याचे सांगत हाय मोकलून रडत होता. मुलाने झाडाला गळफास घेतल्याचा प्रसंग गावचे सरपंच चक्रधर सदगीर यांना सांगितला. त्यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले. सदर ठिकाणी अकोले शहर पोलिसांनी तपासणी करत नवनाथचा मृतदेह अकोले ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करिता पाठवून दिला. शव विच्छेदना नंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात नवनाथ याच्यावर मुथाळणे या गावी अंतिम संस्कार करण्यात आले. घरातील कर्ता पुरुषच गेल्याने सदगीर कुटुंबाची वाताहात झाली. वयोवृद्ध असलेले आई-वडील, पत्नी आणि दोन चिमुकल्याचा भविष्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने मदत करावी अशी मागणी नातेवाईक आणि घरच्यांनी केली आहे.

कार्य करा, पण त्यातून काहीतरी शिका.

स्वामी विवेकानंद
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin