मिळालेले स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर धर्म जात हे मानवाचे व्यक्तिगत स्वभाव राहिले पाहिजे ;- प्रकाश आंबेडकर
अकोले
आपण कुठे आहोत ? हे लक्षात घेतले पाहिजे। विद्यमान सरकारकडे कारवाई करण्याची इच्छाशक्ती नाही। अनेक जण सत्तेवर आली, अनेक जण सत्तेवर येऊन गेले। स्वतःला सत्तेवर आणण्यासाठी जात धर्म याचा उपयोग होणार नाही। आपल्याला त्यासाठी नवीन व्यवस्था निर्माण करावी लागेल। बेरोजगारीचा प्रश्न, रोजगार, अर्थव्यवस्था ह्याच देशाला व्यापक बनवू शकतात। धर्म जात चळवळीचा आणि देशाचा विषय होऊ नये । परंतु आता आपल्या देशात जाती धर्माला प्राधान्य दिले जात असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी केले।
अकोले तालुक्यातील कोतुळ येथे 84 वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या भूमीला पदस्पर्श केला होता। त्यावेळी भाऊदाजी देशमुख यांच्या नातीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे औक्षण केले होते. आज या घटनेला 84 वर्षे पूर्ण झाले. हा पदस्पर्श सोहळा कोतूळ येथे दरवर्षी साजरा केला जातो। यावर्षी एड प्रकाश आंबेडकर यांचेही औक्षण देशमुख कुटुंबीयांच्या सुवासिनी ने केले । ते म्हणाले ,सरकार झोपलेले आहे । कोणतीही सूचना देत नाही, पॉलिटिकल लीडरशिप चे मनोबल वाढवणे गरजेचे आहे. यासाठी 02 मे ला हुतात्मा स्मारक येथे जन आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले ।
पाकिस्तानी सरकार येथील नागरिकांना भारतात घालवत आहे। झालेला करारनामा रद्द करता येत नाही। रद्द केल्यास आम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल असेही ते म्हणाले। सरकार जनतेची दिशाभूल करत असून यावर ठोस कारवाई करण्याचे सरकारने आश्वासित केले पाहिजे। भारताला कॉर्पोरेट जगाचा मोठ्या प्रमाणात धोका असून भारतातील बाजारपेठेने कॉम्पिटिशन करावे लागेल। आमच्या मालाला खुली परमिशन दिली पाहिजे असेही ते म्हणाले।
यावेळी त्यांना पत्रकाराने विचारले असता भाजपा दहशतवादाचा अजेंडा वापरत असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी आरोप केला। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे कधीही एकत्र येणार नसल्याचे सांगत। स्वभावामध्ये मतभेद असल्याचे त्यांनी सांगितले। राजकारणात ब्लाइंड असून चालणार नसल्याचे सांगून बहुजन नेते एकत्र येणे शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले।
पहेलगाम येथील हल्ल्यात काही ठिकाणी धर्म जाती विचारला गेली, तर काही ठिकाणी विचारला गेले नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे। तुम्ही हिंदू म्हणून गेला तर तुम्हाला गोळ्या घालणार! तुम्ही हिंदू आहात तुम्ही येथे येऊ नका ? पूर्वी काश्मिरी पंडितांचा संपूर्ण मुस्लिम समुदायावर ताबा होता तो मायग्रेट करायला लावला आणि सरकारने कंट्रोल घालवला असेही ते म्हणाले. हा दहशतवादी हल्ला एक मेसेज असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
अकोले तालुक्यातील उपक्षितांना पद्मश्री दया पवार आणि दादासाहेबांनी एक दिशा दिली. अकोले तालुक्याचे वैशिष्ट्य हेच आहे की उपेक्षित लोक आमच्या सोबत आहेत असे विजयराव वाकचौरे म्हणाले आमदार डॉक्टर किरण आमटे म्हणाले की बाबासाहेबांच्या घटनेचा वापर करणारे कोण कोण आहेत याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे बाबासाहेबांच्या घटनेमुळे मी आमदार झालो तुमच्या आमचे घटना नसती तर तुमचे आमचे काय झाले असते हा प्रश्न स्वतःला विचारून पहा असेही ते म्हणाले. संघराज रुपवते यांनी दया पवारांचे परिसरातील पाण्याचे दुर्भिक्ष याबाबत आठवण करून दिली ते म्हणाले की "पाणी कुठवर आलं बाई" या असह्य वेदना या शब्दातून आजही होतात त्याची आम्हाला आठवण होते याची जाणीव तमाम जनतेला त्यांनी करून दिली. यावेळी मंचावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे विजयराव वाकचौरे, आमदार डॉ, किरण लहामटे , रवीन्द्र देशमुख, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या दिशा ताई पिंकी शेख महाराष्ट्र राज्याचे वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण सह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी एड, संघराज रुपवते यांनीहकर्यक्रमाचा शेवट संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून झाला.