_*अकोल्यात रंगणार महाराष्ट्राची लोकगाणी : व्हाईस ऑफ मीडिया आणि आमदार डॉ. लहामटे मित्र मंडळाने केले महोत्सवाचे आयोजन ; पुरस्कार वितरण होणार*_
अकोले [ प्रतिनिधी ]
अकोलेकर रसिक प्रेक्षाकासांठी शाहीर रामानंद उगले यांचा 'महाराष्ट्राची लोकगाणी' या सांस्कृतिक, बौध्दिक मेजवाणी असलेल्या कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव सोमवार दि.२४ फेब्रुवारीला सायं, ६ वाजता बाजारतळ अकोले येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी पद्मश्री राहीबाई पोपेरे , आमदार डॉ. किरण लहामटे उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. संपूर्ण कुटुंबा समवेत महोत्सवाचा आनंद घेण्यासारखा असल्याने रसिक अकोलेकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक व्हाईस ऑफ मीडिया आणि आमदार डॉ. लहामटे मित्र मंडळाने केले आहे.