दादासाहेबांचे काम दिशादर्शक : उत्कर्षा रूपवते
[ समतेच्या विचारानेच धम्मयात्रा पुढे जाईल ]
अकोले { प्रतिनिधी }
आपले संपूर्ण आयुष्य माजी मंत्री दादासाहेब रूपवते यांनी समतेच्या चळवळीसाठी वेचले. संघटना, पक्ष आणि संस्थेच्या माध्यमातून त्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार जिवंत ठेवण्याचे काम केले . डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने अकोल्याची भूमी पवित्र झाली. या चळवळीचेच भिमराव (भैय्यासाहेब) एक मानबिंदू होत. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येक व्यक्तीचा श्वास आहेत. या ठिकाणी जमलेला जनसागर बाहेरगावहून आलेले अतिथी, पदाधिकारी, आणि कार्यकर्त्यांनी या सभेची ताकद वाढवली. हेच धम्मयात्रेचे द्योतक होय. या समतेच्या विचारतूनच ही धम्मयात्रा पुढे जाईल असा आत्मविश्वास वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते यांनी व्यक्त केला. दादासाहेब होते यांच्या जन्म शताब्दी निमित्त भंडारदरा शेंडी येथे धम्म सभेचे आयोजन केले होते त्याप्रसंगी उत्कर्षा रूपवते बोलत होत्या. त्या म्हणल्या की, 62 वर्षापासून राजकारण विरहित लोकमानसाची ही धम्मयात्रा विचाराची आणि धम्मप्रसाराचे देवाण-घेवाण करण्यासाठीच आहे. समता सैनिक दलाच्या शिस्तीचे आणि पत्रकारांचेही रूपवते यांनी कौतुक केले. या संघ भावनेतूनच धम्माचा प्रचार प्रसार होत आहे. यातूनच धम्मयात्रा अशीच पुढे जाईल असेही त्या म्हणाल्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भन्ते नागघोष ,भन्ते तेरासावा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि दि बुद्धी सोसायटी ऑफ इंडियाचे सर्वेसर्वा डॉ. भिमराव आंबेडकर, माजी आमदार वैभव पिचड, साहित्यकार डॉ. रावसाहेब कसबे , आ. शिरिष चौधरी , धम्मयात्रेचे सभा अध्यक्ष ॲड. संघराज रुपवते , बी. आर. कदम अध्यक्ष बहुजन शिक्षण संघ, अ.नगर , वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते ख्यातनाम गायक संदेश उमप आणि संपूर्ण रूपवते परिवार तसेच मुंबई , पुणे 'नाशिक ,नगर आदि ठिकाणाहुन आलेले पदाधिकारी विविध मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन पोपटराव सोनवणे यांनी केले तर आभार प्रकाश लहितकर यांनी मानले.