भारत

कालव्याचे पाणी शेतीत शिरल्याने शेतीसह पिकाचे मोठे नुकसान भरपाईची मागणी अन्यथा अंदोलन करू

Blog Image
एकूण दृश्ये: 28

कालव्याचे पाणी शेतीत शिरल्याने शेतीसह पिकाचे मोठे नुकसान भरपाईची मागणी अन्यथा अंदोलन करू

   अकोले 

गर्दणी खानापूर शिवारात निळवंडे डावा कालव्याचे पाणी शेत शिवारात गेल्याने तब्बल 25 एकर शेतीसह पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यामध्ये ऊस, गहू, हरभरा, मका, टोमॅटो, भूईमुग, घास तसेच हिवाळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून टोमॅटो लागवडीसाठी मशागत करून ठेवलेल्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने पीक घेणे आता मुश्किल झाले आहे. आता उन्हाळा लागला असून सोडलेल्या कालव्याच्या पाण्यामुळे जनावरांना लागणा-या घासाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने जनावरांना चारा कुठून आणावा असा प्रश्नही कल्पना रूद्रे या महिलेने यावेळी उपस्थित केला. आमच्या तोंडी‌ आलेला घास हिरावला नेला. या पाण्याने तब्बल 25 एकर शेती बाधित झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात हाल झाले. गर्दनी - खानापूर शिवारातील शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली असून शासनाने त्वरित लक्ष द्यावे अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा राजेंद्र रुद्रे प्रकाश कोतवाल, अंजन कोरडे, बालचंद्र कोरडे ,रामनाथ रुद्रे, सुरेश रुद्रे, कल्पना रुद्रे, परशुराम नाडे, प्रमोद कोतवाल, विठ्ठल कोतवाल, भाऊसाहेब मधे, संजय मधे, भीमराज कोरडे, विठ्ठल रुद्रे या शेतक-यांनी दिला.

संपत्तीपेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा आहे.

शिवाजी महाराज
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin