हल्लीचे राजकारण हे पैशाभोवती फिरणारे :- डॉ कसबे
अकोले { प्रतिनिधी }
विचारसरणी करणारा नेता असावा. असे असेल तरच जनतेमध्ये तुम्हाला स्थान मिळेल. जनतेत पसरलेल्या कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन करावा लागतो महाराष्ट्रातील दोन नेत्याला आपण मानतो, त्यामध्ये भाई वैद्य आणि दादासाहेब रूपवते .भाई वैद्याकडे ज्ञानाचा साठा होता, तर दादासाहेबांकडे प्रचंड जीवनानुभव होता .हल्लीचे राजकारण हे पैशाभोवती फिरणारे आहे. भारतातील राजकीय पक्ष आणि चळवळीचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा दादासाहेब रुपवते यांचे नाव सुवर्णाक्षराने लिहिले जाईल असे स्पष्ट मत ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक रावसाहेब कसबे यांनी मांडले भंडारदरा शेंडी येथे माजी मंत्री दादासाहेब रूपवते यांच्या जन्मशताब्दी तसेच 62 व्या धम्म यात्रेचे आयोजन प्रसंगी ते बोलत होते. डॉ कसबे म्हणाले की, दादासाहेब माझ्या आयुष्यात आलेच नसते तर मी आज कोणीच नसतो ! ना रावसाहेब कसबे, ना लेखक , ना प्राध्यापक. दादासाहेबांच्या हस्ते मी बौद्ध झालेला माणूस आहे. दादासाहेबांनी आम्हाला दीक्षा दिली. दादासाहेबांनी मला जे दिले ते कोणीही ओढून ओरबाडून काढू शकत नाही. सुरुवाती पासून ते आत्तापर्यंतच्या धम्म यात्रेचा मी साक्षीदार आहे. दादासाहेब रूपवते आज असते तर ते शंभर वर्षाचे झाले असते. संदेश उमप यांनी महाकवी वामनदादा कर्डक लिखित दादासाहेबा वरील गीते सादर केली. यावेळी आमदार गिरीश चौधरी, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे सर्वेसर्वा डॉ. बाबासाहेबांचे नातू विचारवंत डॉ भीमराव यशवंत आंबेडकर ,बहुजन शिक्षण संघाचे अध्यक्ष बी आर कदम , सभा अध्यक्ष एड संघराज रुपवते , वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते, एम डी सोनवणे, हिरालाल पगडाल सह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते .