अकोलेकरांनो सावधान ! कितीदा लागावे पाठी ? जागेवर भेटत नाही तलाठी ! अकोलेकर त्रस्त, तलाठी सुस्त
अकोले { प्रतिनिधी }
नागरिकांना गाव आणि शहर पातळीवर कोणत्या न कोणत्या कारणासाठी, कामासाठी ऐनकेन प्रकारे तलाठी कार्यालय गाठावेच लागते. परंतु अनेकदा पाय-या झिजवूनही कामच होत नस्ल्याने _"कितीदा लगावे पाठी जागेवर भेटत नाही तलाठी"_ असेच म्हणण्याची वेळ येवून ठेपल्याने अकोलेकरांनी तलाठ्याच्या कामाकाजावर नाराजी व्यक्त करत तीव्र संतापही व्यक्त केला. एवढेच नव्हे तर हा जांच आता सहन होत नसल्याने नागरिक कोणत्या कामासाठी तलाठी कार्यालयात आले याची नोंदच तलाठी कार्यालयाने का घेऊ नये ? तसेच दिलेला शब्द तलाठ्यांनी का पाळू नये? असे सांगत नागरिकांनी आपली कैफियत मांडत थेट प्रशासनानेच वरिष्ठ स्तरावरून तलाठ्यांच्या कामकाजावर निगरानी ठेवण्याची मागणीच एकप्रकारे केली आहे.
तलाठी कार्यालय म्हणजे नागरिकांच्या अनमोल दस्तावेजाचे ठिकाण. तलाठयांना गाव जमिनीच्या हक्क आणि व्यवहारांची नोंद ठेवावी लागते, तसेच महसुलाची थकबाकी वसूल करणे, सातबारा ७-१२ - ८ अ शेतकजमीन , जलस्रोत्र, गौण खनिजाची नोंद ठेवणे, कार्यालयीन दस्तावेज,दप्तर ने-आण करणे, शिधापत्रिकांची सूची तयार करणे, कार्यक्षेत्र नोंद वह्या, दाखले, संदर्भ आणि नोंदी आदि कामे ही तलाठ्यांना करावीच लागतात.
गावगाडा आला म्हणजे तिथे कामाचा राडा असणारच. शेत , घर, दस्तऐवज, ७ /१२ अशा अनेक कामासाठी नागरिकांना तलाठी कार्यालयात जावूनच करावी लागतात. तसेच महसूल विभागातून तलाठ्या मार्फत ही कामे मार्गी लागतात. परंतु तलाठी वेळेवर आणि जागेवर भेटत नसल्याने नागरिकांना हाकनाक त्रास सहन करावा लागत असतो. असाच प्रकार अकोले शहरात नित्याचाच बनला असून नागरिकांनी आपले नाव न सांगता तलाठी पोमल तोरणे आप्पा यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली. एवढेच नव्हे तर आम्ही अनेकदा चक्करा मारूनही कामेच होत नाही. तक्रार केली तर आमचे कामे होतील का ? असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
अकोलेकरांनी आपली कैफियत मांडली ते म्हणतात कोणत्याही प्रकारे कामे होत नसल्याने त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. समोरच्या व्यक्तींना आपले नाव सांगा? असा आग्रह धरला असता ते म्हणाले की, आम्ही नावे सांगितले तर आमची कामेच होणार नाहीत असेही या नागरिकांचे म्हणणे आहे.नागरिक म्हणतात की, विविध कामासाठी तलाठी कार्यालयात आलो तर परंतु तलाठी महाशय जागेवर नसल्याने नागरिक मात्र हेलपाटे मारूनही बेजार होत असून त्रासदायक अशा चक्रव्युहातून सामोरे जाण्याची वेळ आली आहे. लवकर काम होतच नसेल तर याबाबत वरिष्ठांच्या कानावार घालून मार्ग काढावाच लागेल असा पवित्राच या नागरिकांनी घेतला आहे. या प्रकरणाला वरिष्ठ कितपत दाद देतात हे पाहणे संयुक्तिक ठरेल.
तलाठी कार्यालयात नागरिकांचे कामेच होत नाहीत. ही नित्याचीच डोके दुखी, अन सर्वांचाच सारखा अनुभव. त्यात नागरिकांना नाहक येरझारा माराव्या लागतात. आज या, उद्या या, लग्नाला आलो, अंत्यविधीला आलो. मिटिंग मध्ये आहे, उद्या करतो, पुढच्या आठवड्यात नक्की करतो असे तलाठी आप्पाचे ठरलेले पालुपद. या मध्ये महिनों महिने जावून वर्ष होत आले तरी कामेच होत नसल्याचा अजब अनुभव अनेक नागरिकांना आलेला आपण पाहिला.
तलाठी पोमल तोरणे हे अकोल्यात कार्यरत होण्यापूर्वी त्यांनी संगमनेर मध्ये दोन वेळ तलाठी म्हणून काम पाहिलेले आहे येथील नागरिकांनाही त्यांच्या कार्यपद्धतीचा खूप त्रास झाल्याचे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे. लोकांचे दस्तऐवजाचे काम करतो असे सांगूनही शेवट पर्यंत ही कामे त्यांच्याकडून झालीच नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
'नोकरी' हा शब्द सर्वांना चांगला वाटत असेलही परंतु आपण शासनाचे ,आणि पर्यायाने जनतेचे नोकर आहोत हे विसरून कसे चालेल ? तलाठी हा जनतेचा सेवक आहे. नागरिक प्रेमाने त्यांना आप्पा म्हणतात. हे नमाभिमान मिरवित आप्पा नेहमीच चार चौघात, कधी चौका चौकात गप्पा मारत असताना दिसून येतात. आज या ,उद्या या, पुढच्या आठवड्यात नक्की, असे म्हणत काहींंचे वर्षानुवर्ष येरझारा मारून झाल्या तरी कामे मात्र खोळबलेलीच.याबाबत तलाठी कार्यालयात गेल्यानंतर कर्मचाऱ्यांना विचारले तर ते सांगतात की, दोन-तीन दिवसांनी आप्पा येतील. चुकून कुठे भेट झाली तर हजरजबाबी प्रमाणे तोंड पाठ झालेली शब्द तयार महाशयांकडे दडलेली कारणेच कारणे आहेत. परंतु नागरिकांची प्रकरणे काही केल्या हे महाशय सोडवू शकत नसल्याचे निदर्शनास येते.
महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी या बाबत काय निर्णय घेतात याकडे आता सर्वाचेच लक्ष लागले आहे. महसूल विभागाकडे एखादा दस्तऐवज करण्यासाठी दिला असता त्याची रीतसर पावती आणि मुदत दिल्या जाते परंतु तलाठी कार्यालयात असे काहीच घडत नसल्यास दिसून येत आहे.
पूर्वीच्या तलाठ्यांना सूचना देण्यासाठी गावात दवंडी पिटवावी लागत असे. परंतु आता मात्र अकोल्यातील तलाठी कामच करत नसल्याने आप्पाच्या केवळ गप्पा अशी दवंडी पिटवण्याची वेळ आली हे मात्र खरे!