१२ वी च्या परीक्षेत घडला गैरप्रकार; पर्यवेक्षका विरुध्द शिस्तभंगाच्या कार्यवाहीचा आदेश ; नाशिक विभागातील नंदुरबार लोणखेडा येथील घटना
नाशिक (प्रतिनिधी)
उच्च माध्यमिक इयत्ता १२ वी ची प्रमाणपत्र परीक्षेला पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपरला नंदुरबार जिल्ह्यात लोणखेडा केंद्र क्रमांक ६२५ वर गैर गैरप्रकार उघडकीस आल्याने एका शिक्षकाच्या विरोधात शिस्तभंग कारवाईचा आदेश देण्यात आला. याबाबत घडलेला प्रकार असा आहे की, काल इयत्ता १२ वी परीक्षेचा इंग्रजी या विषयाचा पेपर सुरू असतांना परीक्षा केंद्रावरील झुम मिटींग ॲप द्वारे भटू कुवर या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदर घटनेचे रेकॉर्डीगचे चित्रिकरण झाले असून हा गैरप्रकार घडल्याचे उघडकीस आल्याने सदर शिक्षका विरोधात शिस्त भंगाच्या कारवाईचा आदेश देण्यात आला आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी २०२५ ची परीक्षा ही दि. ११/०२/२०२५ रोजी इंग्रजी या विषयाच्या परीक्षेसाठी लोणखेडा केद्र क्रमांक- ६२५ मधील वर्ग क्रमांक- ०४ मध्ये भटु कुवर हे पर्यवेक्षक म्हणुन कार्यरत होते. सदर शिक्षकाने १२:१० या वेळेत प्रश्नांची उत्तरे सांगत असल्याचे वर्गातील झूम मिटींग ॲप मधील चित्रीकरणात निदर्शनास आल्याचे म्हटले आहे. त्या अनुसंगाने विधि आणि न्याय विभाग सन १९८२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३१ महाराष्ट्र विद्यापीठ मंडळाच्या तसेच इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९८२ नुसार सदर कर्मचाऱ्या विरुध्द नजीकच्या पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करुन सदर पर्यवेक्षका विरुध्द शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्यासाठी संबंधित संस्था, मुख्याध्यापक यांना अपल्या स्तरावरुन अवगत करण्यात यावे असे शिक्षणाधिकारी प्रवीण वसंत अहिरे माध्यमिक जिल्हा परीषद नंदुरबार नाशिक विभाग यांनी सूचित केले आहे. एवढेच नव्हे तर केलेल्या कार्यवाही बाबतचा अहवाल प्रस्तुत कार्यालयास दोन दिवसांच्या आत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नंदुरबार चे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांची स्वाक्षरी असलेले पत्र सोशलमीडियावर व्हायरल झाले असून याबाबत त्यांना संपर्क केला असता ते म्हणाले की, सदर वर्गावर गैरप्रकार झाला त्याचे चित्रीकरण झाले. त्यात ते स्पष्ट झाल्याचे आमच्या निदर्शनात आले असल्याचे नंदुरबार जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री प्रविण अहिरे यांनी सांगितले.
---------------------------------------------------------- ॲड. विकास जगताप सर
मो. 9922876008 / 8999503447
----------------------------------------------------------
आपणास विनंती आहे की , अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या हक्काच्या -
राजगृह न्युज चॅनलला -
https://rajgriha.in/
युट्युब चॅनेलला -
https://youtube.com/@prof.vikasb.jagtapsir.7282?si=7hRUIOgJNM4lqyLl
फेसबुक पेजला -
https://www.facebook.com/share/18JqJ2BzDU/
जास्तीत जास्त लोकांनी लोकांपर्यंत
# लाईक करा @
# शेअर करा @
# सबस्क्राईब करा @
कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा..
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏