साहित्य

*ज्येष्ठ साहित्यिक वृत्तनिवेदक प्रा. अनंत भावे अनंतात विलीन*

Blog Image
एकूण दृश्ये: 35

*ज्येष्ठ साहित्यिक वृत्तनिवेदक प्रा. अनंत भावे अनंतात विलीन* 

    पुणे प्रतिनिधी

आपला आवाज आणि लेखणीने वाचक, रसिक श्रोत्यांच्या हृदयावर आपला अलौकिक अशा भावनांचा ठसा उमटविणारे ज्येष्ठ साहित्यिक, दूरदर्शनचे माजी वृत्तनिवेदक प्रा. अनंत भावे यांनी वयाच्या 88 व्या वर्षी पुण्यातील बोरसे रूग्णालयात रविवार दि.23 ला अखेरचा श्वास घेतला. रात्री वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवंगत ज्येष्ठ लेखिका प्रा. पुष्पा भावे यांचे ते पती होत. प्रा. अनंत भावे यांनी साहित्य, विनोदी साहित्य तसेच बाल साहित्यात मोठे योगदान दिले. तसेच, वृत्तनिवेदक म्हणूनही त्यांनी ओळख मिळवली. बातम्या आणि अनंत भावे हे एक समीकरण बनले होते. ते केवळ लेखकच नव्हे तर स्तंभ लेखक , वृत्तनिवेदक, पत्रकार, व्याख्याते आणि वक्तेही होते. त्यांनी या मराठीला विपुल साहित्य दिले. लेखन केले. भावे हे श्री. ग. माजगावकर यांच्या ’माणूस’ साप्ताहिकात स्तंभलेखन करायचे. 1983 मुंबई येथील विनोदी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला. अनेक पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला. काव्यदीप या मासिकात गजलकार प्रदीप निफाडकर यांनी भावे यांच्या विषयी भरभरून लिहिलय. सामाजिक कार्यकर्त्या, प्रा. आणि लेखिका पुष्पा भावे ह्या अनंत भावे यांच्या पत्नी होत्या. पत्नीच्या निधनानंतर ते एका वृध्दाश्रमात राहत होते. भावे यांच्या जाण्याने वेगळ्या आवाजातील एक जादुगार गेला तसेच मराठी साहित्य क्षेत्राचे मोठे नुकसान झाले.

स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तोच तुमच्या यशाचा पाया आहे.

अज्ञात
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin