भारत

व्यंगचित्रकारांमध्ये माणसाला ओळखण्याची जादू असते !नागराज मंजुळे

Blog Image
एकूण दृश्ये: 9

व्यंगचित्रकारांमध्ये माणसाला ओळखण्याची जादू असते !नागराज मंजुळे 

     पुणे प्रतिनिधी

व्यंगचित्रकारांमध्ये अनेक गुण असतात त्याच गुणातून आणि सदसदविवेक बुद्धीतून रोज नवनवीन व्यंगचित्र काढून चित्रप्रेमी रसिकांना हसवत असतात विशेष करून त्यातून खूप मोठा संदेश सुध्दा देतात. आपण ही आपले व्यंग, व्यंग चित्रकारा कडून काढायला हवे. व्यंग चित्रकारांमध्ये माणसाला ओळखण्याची जादू असते !असे उद्गार प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक "सैराट" फेम नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले . बालगंधर्व रंगमंदिरात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून "विवेक रेषा" हा कार्यक्रम आयोजित करणयात आला होता . या चित्रप्रदर्शनात महाराष्ट्रातील 25 व्यंगचित्रकारांची निवड करण्यात आली. संगमनेर येथील व्यंगचित्रकार संगमनेर साहित्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद गाडेकर व्यंगचित्रकार आनंद गायकवाड यांची निवड करण्यात आली. त्यांना सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्यंगचित्रकार श्री मंजूल हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध पटकथा लेखक व नाटककार अरविंद जगताप यांनी आपल्या भाषणात पंडित नेहरू व आर. के. लक्ष्मण पासून ते इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या बद्दल व्यंग चित्रकारा बद्दल अनेक उदाहरणे देत श्रोत्यांना खळखळून हसवले. अध्यक्षीय भाषणात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्यंगचित्रकार श्री मंजुल यांनी व्यंगचित्रकार आणि त्यांच्या समस्यांवर मौलिक संदेश दिला.. मुक्ता दाभोळकर यांनी प्रस्ताविक केले. मार्मिकचे गौरव सर्जेराव, हमिद दाभोळकर, तसेच संगमनेर साहित्य परिषदेचे, रमेश सराफ, सुभाष कु-हे, बालकृष्ण महाजन, सय्यद असिफ अली, दिलिप उदमले,शेख ईदरीस, हेरंब महाजनासह अनेक श्रोते उपस्थित होते.

स्वप्न पाहा आणि ते साकार करण्यासाठी मेहनत करा.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin