रूग्णालय, वैद्यकीय सेवा पारदर्शक व रुग्णहितवादी बनविण्याचा एकमुखी निर्धार ; वैद्यकीय सेवा पारदर्शकता मंचचा पुढाकार
पुणे { प्रतिनिधी }
नागरिक, कार्यकर्ते, वैद्यकीय तज्ज्ञ आणि विविध संस्था यांनी एकत्र येऊन "वैद्यकीय सेवा पारदर्शकता मंच" या बॅनरखाली खासगी आणि धर्मादाय रुग्णालयांतील वैद्यकीय गैरव्यवहार, रुग्णांची हेळसांड अशा वाढत्या प्रकारण विरोध जनजागृती आणि कार्यवाही घडवून आणण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण अशी चळवळ सुरु करण्यात आली आहे. हा विषय कुठल्याही एका रुग्णालया पुरता न ठेवता संपूर्ण यंत्रणेला पारदर्शकता व रुग्णहितवादी बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत पुण्यात पत्रकार भवन येथे नुकतीच मंचची ऑनलाईन बैठक संपन्न झाली, ज्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, माजी प्रशासकीय अधिकारी, आरोग्य हक्क कार्यकर्ते, डॉक्टर, आय एम ए पदाधिकारी, यांचा महत्वपूर्ण सहभाग होता.
अशी आहेत वैद्यकीय सेवा पारदर्शक मंचाची उद्दीष्टे
१) सरकारी व धर्मादाय रुग्णालयांतील गैरव्यवहार, रुग्णांची हेळसांड यावर लक्ष ठेवणे आणि त्यावर उपाय सुचवणे.
२) शासनांद्वारे रुग्णांना देण्यात येणाऱ्या सर्व योजनांची सुविधांची माहिती सर्वांपर्यंत पोहचवणे आणि त्या सुविधांचा लाभ सर्व रुग्णांना मिळावा यासाठी प्रयत्न करणे.
३) महाराष्ट्र नर्सिंग होम कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी होते की नाही यावर लक्ष ठेवणे.
४) राज्यातील आरोग्य सेवेचा निधी वाढवण्यासाठी व तो निधी योग्य पद्धतीने खर्च व्हावा यासाठी प्रयत्न करणे.
५) वैद्यकीय सेवेतील पारदर्शकता व रुग्ण हक्क निधीच्या विनियोग योग्य पद्धतीने व्हावा याकरिता प्रयत्न करणे.
६) राज्य सरकार, महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे विविध आरोग्य सेवा खाजगी संस्थाकडे दिल्या जात आहेत. ही प्रक्रिया थांबवणे आवश्यक आहे त्यासाठी मंच प्रयत्न करेल.
_मंचाच्या राज्य शासनाकडे मागण्या_
धर्मादाय रुग्णांलयांतील मोफत खाटा (Free Bed) व गरीब रुग्ण निधीचा तपशील रोज संकेत स्थळावर दाखवण्यात यावा, तसेच धर्मादाय रुग्णालयांची देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणामुळे निलंबन / शिस्तभंगाची कार्यवाही करावी. सी जी एच एस (CGHS) व विमा कंपन्यांचे दर या आधारे कायदेशीर प्रक्रियेने खाजगी रुग्णालयांचे दर ठरवावेत, तसेच औषधांचे दर कमी करण्यासाठी राज्यसरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, धर्मादाय रुग्णालयांच्या नावात "चॅरिटेबल" लिहिणे बंधनकारक आहेच परंतु तसे न करणा-यांवर कायदेशीर कारवाई करावी,
राज्याचा सर्वसमावेशक आरोग्य धोरण जाहीर करावा, आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांची, आरोग्य आयुक्तांची व तज्ज्ञांची समिती तयार करून हे धोरण ठरवावे, खासगी रुग्णालयांमधील गरीब रुग्णांसाठी CSR निधीचा वापर करता यावा यासाठी शासनाने योग्य उपाययोजना कराव्यात, प्रमाणित उपचार पध्दती ठरवाव्यात यामुळे अनावश्यक शस्त्रक्रिया व चाचण्या टाळता येतील.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत वाढ करावी, बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे. यासाठी देखील वैद्यकीय पारदर्शकता मंच प्रयत्न करेल. वैद्यकीय गैरव्यहार, रुग्णांची हेळसांड तसेच बिला संदर्भातील तक्रारी नागरिकांनी या surajyasamiti@gmail.com ई- मेल आयडी वर कराव्यात असे आवाहन मंचातर्फे करण्यात येत आहे. तक्रारी पाठवतांना त्या प्रकरणाची संपूर्ण माहिती व संपर्क क्रमांकासह पाठवावी ही विनंती करण्यात येत आहे. अनामिक तक्रारी स्वीकारल्या जाणार नाहीत आदि मागण्या करण्यात येणार आहेत.
_*अधिक माहिती साठी*_
विजय कुंभार 9923299199 दीपक जाधव 9922201192 विनिता देशमुख 9823036663 डॉ. अभिजित मोरे 9158494784 संजय कोणे 7373121290 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.