अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयास पुणे मनपाची नोटीस ; 22 कोटी भराच ; काढला जप्तीचा आदेश
पुणे प्रतिनिधी
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयास पुणे महानगरपालिकेने अखेर नोटीस दिली असून थकबाकीचे 22 कोटी भरण्याचा आदेशच आता जारी केला आहे. रक्कम आदा न केल्यास नोटीसीतून जप्ती करण्याचा सज्जड इशाराच मनपाने दिला आहे.
गेली काही दिवसापासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादाच्या भोव-यात चांगलेच अडडले असून रूग्णालयाचे एकेक कारनामे उखड होत आहेत. गर्भवती महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका रूग्णालयावर बसला असून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवरील ही मोठी कारावाई ठरेल. .विशेष म्हणजे मनपा कडून मंगेशकर रुग्णालयास नोटीस तर बजावली आहेच परंतु 2 दिवसात थकबाकीचे 22 कोटी भरण्याचा आदेशच आता जारी केला आहे.
पैसे भरण्याची सूचना महापालिकेनं दीनानाथ रुग्णालयाला बजावली आहे. 22 कोटी 6 लाख 76 हजार रुपये एवढी मोठी थकबाकी रूग्णालयास भरावीच लागणार आहे. मोठी रक्कम आणि कमी कालावधीच्या नोटीसमुळे रूग्णालय व्यवस्थापन चांगलेच हादरून गेल्याचे दिसून आले.
दोन दिवसापूर्वी पुण्यातून एक अतिशय धक्कादायक आणि दुःखद घटना समोर आली होती आहे. येथील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पैसे नसल्याने एका गर्भवती महिलेला उपचार देण्यात आले नाहीत. उपचार सुरू करण्यापूर्वी रुग्णालयाने २० लाख रुपयांची मागणी महिलेच्या घराच्याकडे केली होती. पैसे भरण्यास असमर्थता दर्शविल्याने उपचार देण्यास रूग्णालयाने नकार दिला होता.
घरच्यांनी काही रक्कम रुग्णालयास अदा केली परंतु संपूर्ण रक्कम भरल्याशिवाय उपचार दिले जाणार नसल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले वेळेवर उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू झाला. ती महिला जुळ्या मुलांची आई होणार होती. रुग्णालयाचा हलगर्जीपणाने तनिषा भिसे प्रकरणात रुग्णालयाला दोषी ठरवण्यात आलं. त्याचे दोन अहवाल येणार आहेत. त्यामध्ये मृत्यू बाबतचा आणि धर्मदाय समिती यांचा अहवाल सादर केला जाणार आहे.