*दहावीचा निकाल लागणार 13 मे रोजी ; निकालाची आतुरता संपली*
संगमनेर { भारत रेघाटे }
नुकताच बारावीचा निकाल लागला असून गेल्या काही दिवसापासून दहावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. दहावीचा निकाल पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता वर्तवली जात होती परंतु आता दहावीचा निकाल मंगळवार दि.13 मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार असल्याचे सूत्रांकडून समजते. आता निकालाची प्रतीक्षा संपली असून विद्यार्थ्यांना बोर्डाच्या संकेतस्थळावर निकालाची माहिती मिळणार आहे.
एस एस सी परीक्षा ही 15 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान घेण्यात आली होती. यावर्षी 10 वी ला 24. 12 लाख विद्यार्थी परीक्षेस बसले होते. आता विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
यासाठी दहावीचा निकाल कुठे अन् कसा पाहावा ? तर तुम्ही ऑनलाइन पद्धतीने तुमच्या मोबाईलवर हा पाहू शकता. यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड वेबसाइट जारी केली आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेबसाइटवर जाऊन निकाल पहावा.
mahahsscboard.in mahresult.nic.in msbshse.co.in mh-ssc.ac.in sscboardpune.in या काही वेबसाइट आहेत.
दहावीचा निकाल उद्या दि. 13 मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार असल्याने याच दिवशी नमूद केलेया वेबसाइटवर जाऊन तुम्ही रिझल्ट पाहू शकतात. यासाठी तुम्हाला वेबसाइटवर जाऊन तुमचा सीट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमच्या आईचे नाव टाकायचे आहे. तुमच्या समोर तुमचा रिझल्ट ओपन होईल.
डिजीलॉकर वरुन डाउनलोड करा निकाल (How to Download SSC Result) या वेबसाइट किंवा अॅपवर जाऊन देखील रिझल्ट डाउनलोड करु शकतात.
प्रथम आपणास डिजिलॉकरवर जाऊन अपर आयडी लॉग इन करायचा आहे. तदनंतर SSC Result असं टाइप करायचे आहे. यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर टाकायचा आहे.सीट नंबरनंतर काही आवश्यक माहिती भरायची आहे.यानंतर तुमचा निकाल तुम्हाला दिसेल. दहावीचा निकाल तुम्ही डाउनलोड देखील करु शकता.