भारत

*प्रा. डॉ. कमलाकर पायस यांना मातृशोक*

Blog Image
एकूण दृश्ये: 9

*प्रा. डॉ. कमलाकर पायस यांना मातृशोक* 

    अमरावती (प्रतिनिधी) 

श्री दादासाहेब गवई चरिटेबल ट्रस्टचे सचिव प्रा. डॉ. कमलाकर पायस यांच्या मातोश्री सुशीलाबाई पायस यांचे वध्दापकाळाने रविवारी ( ता.11) रात्री 11 वाजून 5 मिनिटांनी निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 84 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नांतवड असा बराच मोठा आप्त परिवार आहे. सोमवारी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्य गण उपस्थित होते.

            कारकीर्द       

                  सुशीलाबाई पायस ह्या सामाजिक आणि राजकीय चळवळीत सक्रिय होत्या. त्या चांदूरबाजार तालुक्यातील फुबगाव सैयदापूरच्या प्रथम महिला सरपंच होत्या. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्या , वस्तीगृह निरीक्षक समितीच्या सदस्या, पोलिस शांतता समितीच्या सदस्या तसेच प्रशिक महिला मंडळाच्या अध्यक्षा होत्या. मुलांना घडवण्यात सुशीलाबाईंचा मोठा हात होता. 

यशस्वी माणूस तोच, जो प्रत्येक संकटाला संधी म्हणून पाहतो.

अज्ञात
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin